Skip to main content

Posts

Showing posts with the label पथ्य

लॉकडाऊनमध्ये डायबेटिस कसा नियंत्रणात ठेवता येईल?

आपल्याकडे जवळजवळ पन्नास टक्के लोक डायबेटिक आहेत. सगळ्यांनाच लॉक डाऊनचा सामना करणे हा एक मोठा टास्क आहे आणि त्यात डायबेटिक पेशंटस् अधिकच खचले जातायत. डायबिटीस मुळे शुगर नियंत्रणात आणण्यासाठी व्यायामाची आणि पौष्टिक आहाराची अतिशय गरज असते. त्यात स्ट्रेस मुळे डायबिटीस वाढतो. आत्ताच्या परिस्थितीमध्ये व्यायामाला किंवा चालायला बाहेर जाता येऊ शकत नाहीये आणि घरी असल्याने तोंडावर ताबा ठेवणेही थोडे अवघड जात आहे. अशात रोज करोनाच्या बातम्या वाचल्या, आणि त्यामध्ये आपले आयुष्य गमावलेल्या लोकांची हेल्थ हिस्टरी वाचली तर "डायबेटिक" हा शब्द सारखा टोचत राहतोय.यासाठी आपण सर्वांनी काही काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे जेणेकरून आपले शारीरिक तसेच मानसिक संतुलन उत्तम राहील. जस हे सर्वश्रुतच आहे की स्ट्रेस किंवा मानसिक ताण वाढला की साखरेवरच नियंत्रण कमी होतं. आपल्याला जाणवतही नाही अशा अनेक गोष्टींचा आपण ताण घेत असतो जस पिठ संपलं तर काय?/माझ्या नोकरीचं कसं व्हायचं?/मला करोना नाही ना होणार?/डायबिटीस वाढला तर काय? अशा अनेक गोष्टी. आपल्याला जाणवतही नाही पण आपण सबकॉन्शस लेव्हलला याचा विचार करत र...