आपल्याकडे जवळजवळ पन्नास टक्के लोक डायबेटिक आहेत. सगळ्यांनाच लॉक डाऊनचा सामना करणे हा एक मोठा टास्क आहे आणि त्यात डायबेटिक पेशंटस् अधिकच खचले जातायत.
डायबिटीस मुळे शुगर नियंत्रणात आणण्यासाठी व्यायामाची आणि पौष्टिक आहाराची अतिशय गरज असते. त्यात स्ट्रेस मुळे डायबिटीस वाढतो. आत्ताच्या परिस्थितीमध्ये व्यायामाला किंवा चालायला बाहेर जाता येऊ शकत नाहीये आणि घरी असल्याने तोंडावर ताबा ठेवणेही थोडे अवघड जात आहे.
अशात रोज करोनाच्या बातम्या वाचल्या, आणि त्यामध्ये आपले आयुष्य गमावलेल्या लोकांची हेल्थ हिस्टरी वाचली तर "डायबेटिक" हा शब्द सारखा टोचत राहतोय.यासाठी आपण सर्वांनी काही काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे जेणेकरून आपले शारीरिक तसेच मानसिक संतुलन उत्तम राहील.
जस हे सर्वश्रुतच आहे की स्ट्रेस किंवा मानसिक ताण वाढला की साखरेवरच नियंत्रण कमी होतं. आपल्याला जाणवतही नाही अशा अनेक गोष्टींचा आपण ताण घेत असतो जस पिठ संपलं तर काय?/माझ्या नोकरीचं कसं व्हायचं?/मला करोना नाही ना होणार?/डायबिटीस वाढला तर काय? अशा अनेक गोष्टी. आपल्याला जाणवतही नाही पण आपण सबकॉन्शस लेव्हलला याचा विचार करत राहतो.कधीकधी साखरेवर नियंत्रण राहत नाहीये हेच स्ट्रेस कारण असू शकतं. म्हणजे आपण टोटल व्हिशस सर्कल मध्ये अडकून पडतो.
अशावेळी मेडिटेशन म्हणजेच ध्यान खूप उपयोगी पडते. आपण आधी जर ते केले नसेल तर गूगल/ यूट्यूबवर आपल्याला अनेक छान सोपे ऑडिओ मिळतील. त्याचा आपण नक्कीच फायदा घेऊ शकतो. तसेच डीप ब्रीदिंग एक्ससाइज अर्थात दीर्घ श्वसन याचे महत्व एरवीही पण आत्ता अधिक आहे. मन शांत ठेवायचा प्रयत्न करा.
व्यायामाचे म्हणलात तर बाहेर जात नाही म्हणून चालणे पूर्ण बंद करायची आवश्यकता नाही. आपण घरच्या घरीच एका खोलीतून दुसऱ्या खोलीत सलग अर्धा तास वॉक घेऊ शकता. घर छोटे असेल तर घरातील लोकांना थोडी आपल्या चालण्यासाठी वेळ आणि जागा देता येईल का पहा. घरात चालताना फर्निचर/ कोपरे/भिंती यांच्यापासून जपून चाला. घरात चालणे शक्य नसेल तर आपल्याला मॅटवर करता येण्यासारखे व्यायाम करता येतील.शक्य असेल तर सूर्य नमस्कार करा. तो एक उत्तम सर्वांगाचा व्यायाम आहे. काहीही करून एका अर्धा तास व्यायाम करता येईल असे बघा. आपल्याला झेपेल अशी व्यायामाची लेव्हल निवडा.
जेवताना आपल्या डॉक्टरांचा किंवा आहार तज्ञांनी दिलेला सल्ला पाळा. मधल्या वेळी आपण बोर झालोय म्हणून खातोय का खरंच भूक लागली म्हणून खातोय हे लक्षात घेऊन खा. खाताना लो कॅलरी काय आहे असे बघून खाणे उत्तम. आत्ता शक्यतोवर बाहेरचे खाऊच नका.(करोना आणि डायबिटीस साठी)
घरी असताना पाण्याचे प्रमाणही कमी असू शकते. त्यामुळे मोजून दोन ते अडीच लिटर पाणी प्या. डायबिटीसमुळे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन व्हायची भीती असते त्यासाठी पाणी पिणे अतिशय आवश्यक. (पाण्याचा प्रमाणासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
आपल्या डॉक्टरांनी दिलेली सर्व औषधे/इन्शुलीन वेळच्या वेळी घ्या. त्यात हयगय करू नका. आपल्या डॉक्टरांकडून आपल्या आजाराची माहिती घ्या. जेणेकरून शुगर फ्ल्युक्च्युएशन मध्ये काय करता येईल याचा आपल्याकडे एक प्लॅन राहील.
आपल्या झोपण्या उठण्याच्या वेळा, खाण्यापिण्याच्या वेळा या एरवी सारख्याच सांभाळा. घरी आहात म्हणून वाट्टेल तेव्हा झोपू नका. शरीरामध्ये एक सरक्याडिन रिदम असते. आपल्या शरीरातील न्यूरोलॉजिकल सिस्टीम अर्थात चेतासंस्था ती कंट्रोल करत असते. आपल्या नेहमीच्या झोपण्याच्या व उठण्याच्या वेळाने आपल्या शरीराचे तापमान, आपली पचनसंस्था, आपली रिपेअर सिस्टीम इ. ही ऍक्टिव्हेट किंवा डीऍक्टिव्हेट करण्याचे काम ती करत असते. तिला डिस्टर्ब करू नका.
साखरेच्या लेव्हल वर-खाली झाल्याने फ्रोजन शोल्डर (खांदा अखडणे)व्हायची भीती असते. त्यासाठी हाताची मागे घडी घालता येते का याची नोंद ठेवा. गरज असल्यास आपल्या फिजिओथेरपिस्टशी संपर्क करा.
घरचे काम होत असल्याने पायाच्या बोटांमध्ये ओलावा राहत नाहीये याची खात्री घ्या. जेणेकरून फंगल इन्फेक्शन व्हायचे नाही. ती त्वचा पावडर लावून कोरडी ठेवा.
दररोज दोन वेळा व्यवस्थित ब्रश करा. आणि प्रत्येक खाण्यानंतर उत्तम गुळण्या करा.या परिस्थितीमध्ये दात दुखी मोठी डोकेदुखी होऊ शकते.
आत्ता बाहेर साखर तपासायला जाण्याची सोय नाही किंवा एरवी जेवढी आपण फ्रीक्वेंटली तपासली असती तशी करता येणे थोडे अवघड आहे. घरी ग्लुकोमीटर असेल तर काम थोडे सोपे होईल ( किंवा अवघड!) दोन्ही परिस्थितीमध्ये शुगर वरती कंट्रोल ठेवणे फार आवश्यक आहे!
डायबेटिस हा गोडव्याचा आजार आहे त्याला गोडव्यातच मिटवूया!
डॉ. सुप्रिया अंतरकर जोशी
फिजिओथेरपिस्ट
क्युरा ® फिजिओथेरपी क्लिनिक, पुणे
Very useful and informative details written in a very simplified manner. Thank you Dr Supriya for enlightening on this most needed advice.
ReplyDeleteThank you Dr.Vrushali! Appreciation coming from a successful homeopathy practitioner means a lot to me! 🙂
DeleteAwesome content. If someone is looking for fitness by physiotherapy in Bhopal city, you can check it here
ReplyDeleteFitness by Physiotherapy