मायक्रो ब्रेक म्हणजे 5 ते 10 सेकंदांचा छोटासा ब्रेक किंवा विश्रांती.. आता ही का आणि कशाला घ्यायची ते आपण जाणून घेऊया..
ओव्हर ऑल आत्ता आपलं लाईफ पाहिलत तर आपण एरवी पेक्षाही खूप बसून आहोत. घरातील काम सोडून बाकीचा वेळ एकतर ऑफिसच वर्क फ्रॉम होम किंवा टीव्ही पाहणे किंवा वाचन किंवा मोबाईल वापरणे यातच जातो आहे.
जर तुम्ही बारकाईने पाहिलत तर ही सगळी कामं एकाच ठिकाणी किंवा एकाच स्थितीत बसून किंवा उभं राहून करायची आहेत.
म्हणजे उदाहरणार्थ, जेव्हा आपण कॉम्प्युटर वर काम करत आहोत तेव्हा मान एकाच स्थितीमध्ये खूप वेळ राहते. म्हणजे अॅक्चुली मानेच्या स्नायूंचा ग्रुप सारखा सारखा त्याच दिशेने आणि तेच तेच काम करत राहतो. यामुळे मानेच्या मसल्स वर ताण येऊन ते दुखावले जाऊ लागतात. आपण जागेवरून जरूर उठतो पण साधारण दीड-दोन तासाने. पाणी प्यायला /जेवायला/वॉशरूम ला जायला पण हा सगळा ब्रेक सारखा घेता येऊ शकत नाही. अर्थात हा ब्रेक ही स्नायूंसाठी महत्वाचा असतो. त्याला मॅक्रो ब्रेक म्हणतात. म्हणजे पाच मिनिटं किंवा वरचा ब्रेक.
आता लक्षात घ्या आपण कामामध्ये मेंटल ब्रेक घेतो म्हणजे कामात तोचतोचपणा येत नाही आणि आपण जास्त इफेक्टिवेली काम करू शकतो. तसेच स्नायू नाही आराम मिळण्याच्या दृष्टीने आपल्याला त्यांना ब्रेक द्यायला नको का?
हा ब्रेक जसा आधी म्हणलं तसं पाच ते दहा सेकंदाचा पुरेसा आहे. पण तो दर अर्ध्या तासाने घेणे गरजेचे आहे. खाली मायक्रो ब्रेकचा चार्ट शेअर करत आहे. हे व्यायाम कम्प्युटर वापरताना उपयुक्त आहेतच पण कुठलेही बैठे काम करणाऱ्या साठी उत्तम आहेत.
चार्ट मधील व्यायाम एका ब्रेकमध्ये एक असा केला तरीही चालेल. जसं तुम्ही पाहताय बारा चित्रे आहेत. समजा उदाहरणार्थ, ९३० वाजता तुम्ही पहिला व्यायाम दहा सेकंदासाठी केलात, तर १० वाजता तुम्ही दुसरा व्यायाम दहा सेकंद साठी कराल.. आणि पुढे.
कामांमध्ये हा ब्रेक घ्यायचा लक्षात राहणे अवघड आहे तेव्हा आपल्या मोबाईल मधला अलार्म किंवा ब्रेक रिमाइंडर सारखे ॲप्स वापरता येतील, जे तुम्हाला व्यायामाची विश्रांती घ्यायची आठवण करतील.
असे केल्याने स्नायूंना अतिश्रम व्हायचे नाहीत व त्यांना उत्तम रक्तपुरवठा मेंटेन राहील. म्हणजे अर्थातच सांध्यांवर येणारा ताणही कमी राहील.
हे व्यायाम करून पहा आणि काही शंका असल्यास व्हाट्सअप वर भेटूच!
डॉ. सुप्रिया अंतरकर जोशी
क्युरा ® फिजिओथेरपी क्लिनिक ,पुणे
7276020207
Awesome content. If someone is looking for fitness by physiotherapy in Bhopal city, you can check it here
ReplyDeleteFitness by Physiotherapy